उपक्रम
सारसबाग पुणे मध्य शाखेतर्फे जनजाती कल्याण समिती तर्फे चालवण्यात येणाऱ्या भोर येथील वस्तीगृह प�

  April 02,2024

  

भारत विकास परिषद सारसबाग पुणे मध्य शाखेतर्फे जनजाती कल्याण समिती तर्फे चालवण्यात येणाऱ्या भोर येथील वस्तीगृह प्रकल्पास भेट.
भारत विकास परिषद सारसबाग शाखेतर्फे भोर येथे चालवण्यात येणाऱ्या जनजाती कल्याण योजनेअंतर्गत वसतीगृहास भेट देण्यात आली. पुणे मध्य सारसबाग शाखेतर्फे रुपये 25000 चा धनादेश सेवाकार्य अंतर्गत देणगी स्वरूपात देण्यात आला. या कार्यक्रमास जनजाती कल्याण चे विद्यार्थी तसेच भारत विकास परिषदेचे पुणे मध्य शाखेचे अध्यक्ष दीपक पुजारी, सचिव पल्लवी जाधव, कोषाध्यक्ष मनोज कुलकर्णी, माधवरावजी चिरमे, शिवाजीराव भागवत, प्रमोद प्रभू, कल्पना रावल, विलास दातार, चंद्रशेखर भिंगारकर . जनजाती कल्याण समिती  तर्फे प्रकाश खिचडे, प्रांत सहसचिव सुरेश हनुमंते, सचिव प्रकाश पानसे, कोषाध्यक्ष योगेश कुलकर्णी, महानगर सचिव उदय जोशी हे उपस्थित होते. 
  भारत विकास परिषदेच्या सेवाकार्यांतर्गत ही देणगी देण्यात येत आहे असा उल्लेख श्री दीपक पुजारी यांनी केला. तसेच विद्यार्थ्यांनी केवळ नोकरी न शोधता व्यवसायाकडे जावे असा संदेश शिवाजीराव भागवत यांनी दिला, तर माधवरावजी चिरमे यांनी पोलीस दलात सामील होताना काय केले पाहिजे याचे मार्गदर्शन केले.